मुंबई : शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छापा टाकला असल्याची माहिती समोर येत आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी तसेच कार्यालयांवर सकाळी छापा टाकण्यात आला आहे. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विंहग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचे पथक पोहोचले असल्याचे म्हटले जात आहे.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई केल्याची शक्यता आहे. मात्र अद्याप ईडीकडून याला दुजोरा देण्यात आलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात ईडीचं पथक दाखल झालं आहे.
सकाळी आठ वाजता ही कारवाई करण्यात आली असून एकूण १० ठिकाणी धाड टाकण्यात आली आहे. कारवाईचे नेमके कारण अद्यापही समोर आलेले नाही. दरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत.