नवी दिल्ली – अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीचा एक भाग म्हणून कॉंग्रेस पक्षाच्या मालकीच्या नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राच्या मुख्य कार्यालयासह डझनभर ठिकाणी छापे टाकले. निधीच्या स्त्रोताच्या संदर्भात अतिरिक्त पुरावे गोळा करण्यासाठी” मनी लॉंडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या गुन्हेगारी कलमांतर्गत हे छापे टाकण्यात आल्याचे संबंधीतांकडून सांगण्यात आले.
मध्य दिल्लीतील बहादूर शाह जफर मार्ग, आयटीओ येथे असलेल्या ‘हेराल्ड हाऊस’ कार्यालयाचीही यावेळी झडती घेण्यात आली. या प्रकरणी ईडीने अलीकडेच कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे खासदार पुत्र राहुल गांधी आणि काही इतर कॉंग्रेस नेत्यांची चौकशी केली आहे. हे सन 2013 सालातील प्रकरण असून यात कोणताही गैरप्रकार झाल्याच्या आरोपाचा कॉंग्रेसने या आधीच इन्कार केला आहे. केवळ राजकीय सूड बुद्धीतून हा सारा प्रकार सुरू असल्याचे कॉंग्रेसचे म्हणणे आहे.