जीव्हीके समूहावर ईडीकडून पुन्हा छापे

मुंबई – मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड अर्थात “मियाल’मधील मनी लॉन्डरिंगच्या तपासासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज जीव्हीके समूहाविरूद्ध अनेक ठिकाणी छापे घातले. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनामध्ये 705 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराची ईडी चौकशी करीत आहे.

मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार “ईडी’कडून मुंबई आणि हैदराबादमधील नऊ जागांवर छापे टाकण्यात आले. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एमआयएएल) च्या निधीतून 705 कोटी रुपयांच्या अफरातफरी संबंधित ईडी आणि सीबीआयने प्रकरण दाखल केले आहे.

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड हा इतर गुंतवणूकदारांव्यतिरिक्त जीव्हीके एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) यांच्यातील सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्वावरील संयुक्त गुंतवणूक प्रकल्प आहे. आजच्या छाप्यांमधील तपशील ईडीकडून प्रसिद्ध केला गेलेला नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.