मिर्चीशी संबंधित ठिकाणांवर “ईडी’चे छापे

मनी लॉन्डरिंगशी संबंधित पुराव्यांचा शोध

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्‍बाल मिर्ची याच्याविरूद्ध मनी लॉन्डरिंगच्या आरोपांच्या तपासासंदर्भात “ईडी’ने शनिवारी “डीएचएफएल’ आणि इतर संबंधित कंपन्यांच्या सुमारे डझनभर ठिकाणांवर छापे घातले. मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदीनुसार मुंबई आणि त्याच्या आसपासच्या डझनभर ठिकाणी छापे टाकले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.

दिवाण हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे (डीएचएफएल) आणि सनब्लिंक रिअल इस्टेटबरोबर व्यवसायिक संबंध आहेत. सनब्लिंक रिअल इस्टेट मिर्चीच्या आर्थिक व्यवहाराच्यासंदर्भात तपासाच्या केंद्रस्थानी राहिली आहे. डीएचएफएलने स्नब्लिंक रिअल इस्टेट कंपनीला 2,186 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. सनब्लिंकने हा पैसा मिर्ची आणि त्याच्या साथीदारांच्या खात्यांमध्ये वळवला असल्याचा “ईडी’ला संशय आहे. तपासाचा एक भाग म्हणून एजन्सी कागदपत्रे आणि इतर अन्य स्वरूपातील पुरावा शोधत आहे.

कोणत्याही संशयास्पद व्यवहारांशी आपला संबंध नाही, असे डीएचएफएलने पूर्वी सांगितले होते. मिर्ची आणि इतरांच्या कोट्यवधी कोटी रिअल इस्टेट सौद्यांशी संबंधित मनी लॉन्डरिंग प्रकरणात ईडीने अलीकडेच मिर्चीच्या दोन साथीदारांनाही अटक केली आहे. 2013 मध्ये लंडनमध्ये मिर्चीचा मृत्यू झाला.

या प्रकरणात मिर्चीच्या कुटुंबीयांसोबत केलेल्या मालमत्तेच्या व्यवहारांसाठी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची शुक्रवारी “ईडी’ने चौकशी केली होती. त्यांनीही आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.