येस बॅंकेचे संस्थापक राणा कपूरच्या घरावर ईडीचा छापा

राणा कपूर यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी

मुंबई : येस बॅंकेचे संस्थापक आणि माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांच्या वरळीतील समुद्र महल घरावर ईडीच्या सहा सदस्यांच्या टीमने रात्री छापा टाकला. मनी लॉंड्रिंग कायद्यांतर्गत ईडीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी सुरु केली. त्यानंतर राणा कपूर यांच्याविरोधाथ लूक आऊट नोटीसही बजावण्यात आली आहे. त्यामुळे कपूर यांना देश सोडून जाता येणार नाही. राणा कपूर यांच्यावर वारेमाप कर्जवाटप केल्याचा आरोप आहे.

डीएचएफएल कंपनीला कर्ज देण्याच्या बदल्यात फायदा मिळवल्याचा गंभीर आरोप यांच्यावर करण्यात आला आहे. राणा कपूर यांनी येस बॅंकेद्वारे आपल्या अधिकारात नियमबाह्य कर्ज वाटप केले आहे. कर्ज वाटप करणे आणि ते वसूल करण्याची प्रक्रियाही त्यांनी ठरवली. आपल्या वैयक्तिक संबंधातून हे कर्ज वाटप केल्याचे समोर आले आहे. 2017 मध्ये राणा यांनी जवळपास 6355 कोटींची कर्ज वाटप केल्याचे उघड झाले आहे.

वरळीच्या समुद्र महल बिल्डिंगमध्ये राणा कपूर यांचा प्लॅट आहे. या बिल्डिंगमध्ये देशातील अनेक व्यावसायिक, मोठ्या कंपन्यांचे सीईओ राहतात. पीएनबी बॅंक घोटाळ्याचा आरोपी नीरव मोदीचाही या बिल्डिंगमध्ये फ्लॅट आहे. या समुद्र महल बिल्डिंगमधील फ्लॅट 1 लाख स्क्वेअर फूटाने विकला गेला होता, त्यावेळी ही बिल्डिंग चर्चेत आली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.