ED Raid in Punjab । बेकायदेशीर खाणकाम आणि भोला ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली. केंद्रीय तपास यंत्रणेने पंजाबमधील रूपनगर जिल्ह्याच्या जवळपास 13 ठिकाणी छापे टाकले आहेत. या छापेमारीत आतापर्यंत 3 कोटी रुपयांची रोकड जप्त केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
बेकायदेशीर खाणकाम ED Raid in Punjab ।
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदीश सिंग उर्फ भोला ड्रग्स प्रकरणात एजन्सीने जप्त केलेल्या जमिनीवर बेकायदेशीर खाणकाम केले जात असल्याची माहिती ईडीला मिळाली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सूत्रांनी सांगितले की, नसीब चंद आणि श्री राम क्रशर आणि इतरांचाही या अवैध खाण प्रकरणात सहभाग आहे.
काय प्रकरण आहे? ED Raid in Punjab ।
पंजाबमधील ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंगचे हे प्रकरण २०१३-१४ दरम्यान पोलिसांनी उघडकीस आणले होते. यानंतर पंजाब पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे ईडीने गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणातील तपासादरम्यान जगदीश सिंग उर्फ भोलाचे नाव समोर आले. या प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेने जानेवारी २०१४ मध्ये भोलाला अटक केली होती.