शिवसेना मंत्री अनिल परब यांना पुन्हा ईडीची नोटीस

मुंबई – राज्यातील शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांना ईडीने पुन्हा समन्स जारी केले आहेत. अनिल देशमुख यांच्या विरोधात जो मनिलॉड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्या अनुषंगाने परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर हे समन्स जारी करण्यात आले आहे. त्यांना पुढील आठवड्यात ईडीपुढे हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

अनिल परब यांना या आधी 31 ऑगस्ट रोजी समन्स जारी करण्यात आले होते. पण त्यावेळी त्यांनी पुर्वनियोजित कार्यक्रम असल्याचे सांगून हजर राहणे टाळले होते. आता त्यांना 28 सप्टेंबर रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. देशमुख यांच्यावरही वाझे यांच्या शंभर कोटी रूपयांच्या वसुलीच्या प्रकरणात आत्तापर्यंत पाच वेळा समन्स जारी करण्यात आली असून त्या समन्सला देशमुख यांनीही धूप घातलेली नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.