नवी दिल्ली -नॅशनल हेराल्ड प्रकरणात हजर राहण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी त्यांच्या निवासस्थानातून ईडी कार्यालयाकडे रवाना झाल्या आहेत. त्याच्यासोबत राहुल आणि प्रियांका देखील आहेत.
Delhi | Congress workers protest the ED probe against party chief Sonia Gandhi who is set to appear before the probe agency today in National Herald case pic.twitter.com/N1Bski8p7u
— ANI (@ANI) July 21, 2022
ईडी कडून सुरु झालेल्या या चौकशीच्या निषेधार्थ काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. दिल्ली, मुंबईसह काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्ते रसत्यावर उतरत ईडी आणि मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहे.
पिट्ठू ED के पीछे छिप कर मोदी सरकार सच को डराना चाहती है पर वो भूल गये हैं कि सच न परेशान हो सकता है न पराजित।
श्रीमती सोनिया गाँधी के नेतृत्व में सच की यह जंग जारी रहेगी।
न डरेंगे, न दबेंगे, न झुकेंगे।
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) July 21, 2022
दरम्यान, सोनिया गांधींच्या ईडी चौकशीवर काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, ‘आम्ही न दडपणार, ना झुकणार, फक्त पुढे जाऊ. पिठ्ठू ED, डरपोक CBI और IT’ ते पुढे म्हणाले,’आता सूडाच्या राजकारणात पेटलेले पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सरकार ना काँग्रेसला घाबरवू शकले ना लोकशाहीला.’ तर काँग्रेसचे जेष्ठ नेते शशी थरूर म्हणाले की, ‘हा अन्याय सुरू असून अन्यायाचे राजकारण होता कामा नये.’