मुंबई – फॉक्सकॉन आणि वेदांत समूहाचा सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प आता महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलवण्यात आला आहे. यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून विरोधी पक्षातील नेत्यांनी याच मुद्यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. यातच काँग्रेस नेते नाना पाटोले यांनीही यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
नाना पाटोले यांचे ट्विट
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्यासाठी ईडी सरकार सत्तेत आले !#Maharashtra pic.twitter.com/CFq9cAqod8
— Nana Patole (@NANA_PATOLE) September 14, 2022