मुंबईत सहा ठिकाणी मारले छापे
मुंबई – मुंबईतल्या पंजाब ऍन्ड महाराष्ट्र सहकारी बॅंकेच्या म्हणजेच पीएमसी बॅंकेच्या प्रकरणात सक्त वसुली विभागाने कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणात एकूण सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. या प्रकरणात ईडीकडे मनि लॉड्रिंग कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर यात ईडी कार्यरत झाली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मनि लॉड्रिंग च्या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
पीएमसी बॅंकेने ज्या एचडीआयएल कंपनीला साडे सहा हजार कोटी रूपयांचे कर्ज दिले आहे, त्या कंपनीच्या संचालकांसह बॅंकेच्याही काही संबंधीत ठिकाणांवर छापेमारी केली असल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात जो एफआयआर दाखल करण्यात आला आहे, त्यात बॅंकेचे माजी अध्यक्ष वरयामसिंग, व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस आणि अन्य वरीष्ठ अधिकाऱ्यांची नावे आहेत असे सांगण्यात येत आहे.