मुंबई – मनी लॉंड्रिंगच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या येस बॅंकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी येथील विशेष न्यायालयात चार्ज शिट दाखल करण्यात आले आहे.
येस बॅंकेचे माजी एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कपूर यांना 8 मार्च रोजी ईडीने मनी लॉंड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए) अटक केली होती. त्यांच्यावर काही कंपन्यांना बेकायदा कर्ज मंजूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, दिवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेड (डीएचएफएल)शी संबंधित एका कंपनीकडून 600 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळाप्रकरणी तपास करीत आहे. कपूर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी बेकायदेशीपणे सुमारे 4 हजार 300 कोटी रुपयांचे कर्ज दिल्याची माहिती ईडीने दिली आहे.
नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता (एनपीए) झालेल्या काही मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना देण्यात आलेल्या कर्जाच्या वसुलीत सुलभतेसाठी लाच घेतल्याचादेखील त्याच्यावर आरोप आहे.