नवी दिल्ली – ईडीने भूषण स्टील कंपनीची 61 कोटी 38 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मनिलॉंड्रिंग प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये कंपनीची रायगड जिल्ह्यातील शेत जमीन, गोदाम आदी मालमत्तांचा समावेश आहे. त्याची एकूण किंमत 61 कोटी 38 लाख रुपये इतकी आहे.
नीरज सिंघल आणि बी. बी. सिंघल हे या कंपनीचे मालक आहेत. या मालकांनी त्यांना इतर मार्गाने मिळालेले उत्पन्न या गुंतवणुकीत घातले आहे. त्यांनी दुसऱ्या कंपन्या स्थापन करून त्या नावावर मोठी कर्जे घेऊन फसवणूक केल्याचाही ईडीचा आरोप आहे. या कंपनीच्या व्यवहारांची चौकशी करून त्यांच्या विरोधात ऑगस्ट 2019 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे.