मुंबई – गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी ईडीकडून केली जात होती. त्यानंतर आज ईडीने खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने त्यांची ५ कोटी ७३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
याआधी एकनाथ खडसे यांच्या जावायाला ईडीकडून अटक कऱण्यात आली होती. त्यानंतर आता ईडीने खडसेना आपल्या रडारावर ठेवले असून त्यांनी ५ कोटी ७३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये जळगाव व लोणावळ्यातील मातलमत्तेचा समावेश आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात एकनाथ खडसेंची चौकशी केली जात असतानाच ही कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे.
एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांनी पुण्यातील भोसरी येथील एक भूखंड विकत घेतला. या भूखंडाचा बाजारभाव ३१ कोटी रुपये असताना गिरीश यांनी तो अवघ्या तीन कोटी रुपयांना विकत घेतला. हा भूखंड एमआयडीसीच्या मालकीचा होता. त्यावेळी म्हणजे २०१६ मध्ये एकनाथ खडसे महसूलमंत्री होते. इतक्या कमी किंमतीत व्यवहार कसा काय झाला? गिरीश यांनी तो विकत घेण्यासाठी गोळा के लेल्या तीन कोटी रुपयांचा स्रोत काय? या मुद्यांवर ‘ईडी’चा तपास सुरू केला होता.