पुणे- पुण्यातील नामांकित उद्याेगपती अविनाश भाेसले सध्या सक्त अंमलबजावणी संचनालयाचे (ईडी) रडारवर असून अविनाश भाेसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीशी संबंधित काॅर्पाेरेट ऑफीसची चार काेटी रुपयांची स्थिर मालमत्ता जप्त केली आहे.
अविनाश भाेसले यांचेवर मनी लाॅड्रिंग प्रकरणी पुणे पाेलीसांकडे तक्रार दाखल असून त्या बाबतचा तपास सध्या ईडी करत आहे. पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावरील रेंज हिल येथील यशवंत घाडगे नगर काेऑपरेटिव्ह हाैसिंग साेसायटीत प्लाॅट नंबर दाेनवर अविनाश भाेसले यांचे अलिशान काॅर्पारेट ऑफीस आहे. रणजीत माेहिते यांनी संबंधित कार्यालयाची जागा एआरए प्राॅपर्टी यांच्याकडे बेकायदेशीरित्या हस्तांतरित केली. संबंधित जमीन शासकीय असल्याने केवळ शासन व त्याच्याशी संबंधित संस्था यांना हस्तांतरित करण्याचा नियम १९५१ पासून असताना ती बेकायदेशीररित्या हस्तांतरित केली गेली.
ईडीने मनी लाॅड्रिंग प्रकरणाचा तपास करत असताना अविनाश भाेसले यांचे कंपनीशी संबंधित वेगवेगळया ठिकाणी छापेमारी करत महत्वपूर्ण कागदपत्रे आणि पुरावे गाेळा केले आहे. छापेमारीत मिळालेल्या कागदपत्रांचे विश्लेषणावरुन भाेसले यांचे विराेधात एफआयआर दाखल करण्यात आलेली असून पुढील तपास करण्यात येत आहे.
यापूर्वी ईडीने फेमा कायद्या अंर्तगत भाेसले यांची पुणे व नागपूर येथील ४० काेटी ३४ लाखांची मालमत्ता जप्त केलेली आहे.दक्षिण मुंबईतील भाेसले यांचे मालकीचा अलिशान फ्लॅट ही ईडीचे रडारवर आहे. विदेशी चलन प्रकरणात यापूर्वी भाेसले यांची दाेन वेळा चाैकशी झालेली असून ईडीने अविनाश भाेसले व त्यांचा मुलगा अमित यांना ही चाैकशीसाठी समन्स काढून त्यांना चाैकशीस बाेलवले हाेते.