इलेक्‍ट्रॉनिक कचऱ्याच्या निपटाऱ्याची आवश्‍यकता

दावोस – जगासमोर आता इलेक्‍ट्रॉनिक कचरा ही एक नवीन गंभीर समस्या आगामी काळात निर्माण होणार असून ते एक सर्वात मोठे ओझे सहन करावे लागणार असल्याचे मत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मंचावर व्यक्त करण्यात आले आहे. आपले आरोग्य आणि पर्यावरण यांच्यासाठी ही सर्वात गंभीर समस्या निर्माण होणार असल्याची भीती या संमेलनात सादर करण्यात आलेल्या एका अहवालातून व्यक्त केली आहे.

वर्षाला आपण पाच कोटी टन ई कचऱ्याची निर्मिती करत असून तो आगामी 2050 पर्यंत वाढत जात 12 कोटी टन या टप्प्यावर पोहोचणार आसल्याचा अंदाज मांडण्यात आला आहे. हा कचरा जगभरात आतापर्यत प्रवासी विमानाची निर्मिती केली आहे. त्याच्याहून अधिक ई-कचरा निर्माण होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम वार्षिक संमेलनात संयुक्त राष्ट्र ई – कचरा व्यवस्थापन यांच्यासह सादर करण्यात आलेल्या अहवालात या विषयावर विस्ताराने चर्चा घडवून आणली आहे.
कचऱ्याचे मूल्यमापन करण्यात आल्यावर प्रतिवर्षी 62 अब्ज डॉलर पर्यत ई-कचऱ्याची निर्मिती होत असल्याचे अनुमान असून जगभरातील चांदी उत्पादनाशी तुलना केल्यास तीन पट असल्याचे नोंदवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)