आर्थिक विकास वाढतच जाईल; RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा विश्वास

मुंबई – येत्या काळात देशाचा आर्थिक विकास वाढतच जाईल, असा विश्‍वास रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्‍तिकांत दास यांनी व्यक्‍त केला आहे. पुढील आर्थिक वर्षात देशाचा विकासदर साडेटक्‍के इतका होईल, असा दावा त्यांनी केला.

तथापि त्यांनी केलेला हा विकास दराचा दावा सरकारने वर्तवलेल्या अंदाजापेक्षा कमीच आहे. सरकारने पुढील आर्थिक वर्षात अकरा टक्के दराने जीडीपी वाढेल असे म्हटले होते. सध्या हा दर उणे 7.7 टक्के इतका आहे.

त्यांनी रिझर्व्ह बॅंकेंचे द्विपक्षीय धोरण जाहींर केले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, आगामी काळात अर्थव्यवस्था केवळ एकाच दिशेने वाढताना दिसले ती दिशा म्हणजे केवळ विकासाचीच असेल असे ते म्हणाले. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पामुळे देशातील गुंतवणुकीचे वातावरण सुधारेल आणि देशातील मागणीही वाढेल असे त्यांनी नमूद केले.

देशात सध्या जी लसीकरणाची मोहीम सुरू आहे त्यातून भारतीय औषध कंपन्यांना जगभरात चांगले वातावरण लाभेल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. गेल्या काही काळात करोनामुळे देशाचे जे नुकसान झाले आहे ते नुकसान यावर्षी भरून निघेल असेही त्यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.