Ecole T20 Cup 2024 :- विवेक अंची व कर्णधार बाळकृष्ण काशीद यांनी केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर सोलापूर स्टार इलेव्हन संघाने रिक्रिएशन क्लब संघावर ५ गडी राखून मात करताना, इकोल स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इकोल टी-२० करंडक स्पर्धेत आपली आगेकूच कायम राखली.
शिंदे हायस्कुलच्या मैदानावर झालेल्या लढतीमध्ये प्रथम फलंदाजी करताना, रिक्रिएशन संघाने निर्धारित २० षटकांत ९ बाद १३८ धावांपर्यंत मजल मारली. अथर्व दातारने २१ चेंडूत ३७ धावांची खेळी करताना संघाला १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. त्याला सौरभ दोडकेने २७, रुद्रज घोसाळेने १७ तर शुभम मानेने १६ धावा करताना सुरेख साथ दिली. बाळकृष्ण काशीदने १८ धावांच्या मोबदल्यात ४ बळी टिपले. पुष्कराज खराडेने ३ तर जय पांढरेने २ गडी बाद केले.
Ecole T20 Cup 2024 : रिक्रिएशनची विजयी आगेकूच, मेव्हिरिक्सवर केली मात….
सोलापूर संघाने १९ षटकांत ५ बाद १४२ धावा करताना विजय साकारला. विवेक अंचीने एक बाजू लावून धरताना ५४ चेंडूत ८ चौकार व १ षटकार मारताना ६५ धावांची खेळी केली. त्याला अक्षय पंचार्यने १६, वैष्णव जावळेने १८ व निरंजन कदमने १९ धावा करताना संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. साहिल कडने २ तर सौरभ दोडके, रुद्रज घोसाळे व आदिनाथ गायकवाड यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.