Ecole T20 Cup 2024 (Pune) – राजस्थान रॉयल्स अकादमी संघाने मेव्हिरिक्स अकादमी संघाला ६ गडी राखून पराभूत करताना इकोल स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इकोल टी-२० करंडक स्पर्धेत विजयी आगेकूच केली. शिंदे हायस्कूलच्या मैदानावर आज झालेल्या पहिल्या लढतीमध्ये प्रथम फलंदाजी करताना मेव्हिरिक्स अकादमी संघाने निर्धारित २० षटकांत ८ बाद १८६ धावांपर्यंत मजल मारली.
संदीप शिंदेने २७ चेंडूत ६० धावांची धमाकेदार खेळीत २ चौकार व ७ षटकार लगावले. संदीपला हर्षल हडकेने ३७, शुभम तैस्वालने ४१ व हरी सावंत २१ धावा करताना संघाला चांगले धावसंख्या उभारून दिली. सुनील यादव व तनय संघवी यांनी प्रत्येकी २ तर, निखील कदम, रवींद्र जाधव व निमिर जोशी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
सलामावीर अद्वय सिधयेच्या दमदार खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने १८.३ षटकांत ४ बाद १९० धावा करताना विजय साकारला. अद्वय सिधयेने ४६ चेंडूत ७ चौकर व ५ षटकार मारताना नाबाद ८२ धावांची खेळी करताना संघाला विजय मिळवून दिला. अद्वयला साव्या गजराजने ३२(३ चौकार, २ षटकार), ऋषभ राठोडने ३९ (२ चौकार, ४ षटकार) तर वेदांत पाटीलने नाबाद १६ (२ चौकार, १ षटकार) धावा करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अनिश गायकवाड २ तर संदीप शिंदे व वैभव गोसावी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
Ranji Trophy 2024-25 : अय्यरचे द्विशतक अन् मुलाणीचे 11 बळी; मुंबईने ओडिशावर नोंदवला मोठा विजय…
संक्षिप्त धावफलक :
मेव्हिरिक्स अकादमी : २० षटकांत ८ बाद १८६ : संदीप शिंदे ६० (२ चौकार, ७ षटकार) हर्षल हडके ३७, शुभम तैस्वाल ४१, हरी सावंत २१, सुनील यादव २-४०, तनय संघवी २-२८, रवींद्र जाधव १-२९, निमिर जोशी १-११, निखील कदम १-४७ पराभूत वि. राजस्थान रॉयल्स अकादमी : १८.३ षटकांत ४ बाद १९० : अद्वय सिधये ८२ (७ चौकर, ५ षटकार), साव्या गजराज ३२(३ चौकार, २ षटकार), ऋषभ राठोड ३९ (२ चौकार, ४ षटकार) वेदांत पाटील नाबाद १६ (२ चौकार, १ षटकार), अनिश गायकवाड : २-३४, संदीप शिंदे १-१६, वैभव गोसावी १-११.