निवडणूक आयोगाचे भारतीय जनता पक्षाला आदेश
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आचार संहितेचे उल्लंघन केल्याबद्दल केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि पर्वेश शर्मा यांना भारतीय जनता पक्षाच्या स्टार प्रचाराच्या यादीतून काढून टाकण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले. भाजपाच्या या दोन नेत्यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही कारवाई करण्यात आली.
पक्षाच्या मेळाव्यात बोलताना ठाकूर युांनी विरोधकांचा उल्लेख देशाचे गद्दार असा केला होता. तर शाहीनबागेतील निदर्शक हे घरात घुसून बलात्कार करतील असे वादग्रस्त वक्तव्य वर्मा यांनी केले होते. पुढील आदेश मिळेपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून अनराग ठाकूर आणि पर्वेश वर्मा यांना काढून टाकावे, असे आदेश दिल्याचे आयोगाने सांगितले.
आपल्या वक्तव्याने धार्मिक विद्वेष पसरवला जात अआहे. त्यामुळे धार्मिक आणि राजकीय ध्रुवीकरण होण्याची शक्यता असून त्यामुळे आचार संहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी 30 जानेवारीपर्यंत खुलासा करण्याचे आदेश आयोगाने दिले. आयोगाने या प्रकरणात दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला. त्यानंतर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.