दररोज अंडी खाल्ल्याने ‘या’ दिर्घ आजाराचा धोका

 

मेलबर्न- संडे हो या मंडे, रोज खाएं अंडे असे म्हटले जात असले तरी एका नवीन संशोधनाप्रमाणे दररोज अंडी खाल्ल्याने टाईप २ प्रकारातील मधुमेह होण्याचा वाढता धोका आहे

ऑस्ट्रेलियातील या संशोधनाप्रमाणे दररोज अंडी खाल्ली तर मधुमेह होण्याचा धोका ६० टक्क्याने वाढतो ऑस्ट्रेलियातील या संशोधकांनी ८५४५ चिनी युवकांवर संशोधन केले तेव्हा अंड्यांचा अतिरिक्त आहार आणि शरीरात साखर वाढण्याचा संबंध आहे

जगात सर्वत्र आहारातील एक महत्वाचा घटक म्हणून अंड्याकडे पहिले जाते अंड्यामध्ये पोषक तत्वे भरपूर असतात त्यामुळे अंडी दररोजच्या आहारात असावीत असे सांगितले जाते पण आता मधुमेह आणि अंडी यांचा संबंध समोर आल्याने आहारतज्ज्ञ गोंधळात सापडले आहेत

साउथ ऑस्ट्रेलिया यूनिवर्सिटीचे संशोधक  डॉक्टर मिंग ली यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे चीनमधील लोकांमध्ये अंड्यांचा आहार दररोज असल्याने त्यांच्यावरच प्रयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला  खास करून अंड्यापासून बनवलेले फास्ट फूड खाण्याकडे युवकांचा कल  असल्याने युवकांवर प्रयोग करण्यात आला त्यानंतर हा निष्कर्ष समोर आला

काही वर्षांपूर्वी झालेल्या संशोधनाप्रमाणे अंडी आणि मधुमेह यांचा काही संबंध नाही असा निष्कर्ष निघाला होता पण नवीन संशोधनात त्याच्या अगदी उलट निष्कर्ष समोर आले आहेत

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.