दिवाळीनिमित्त विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. अशा परिस्थितीत स्वत: ला या पदार्थांपासून दूर ठेवणे अवघड असतं. दिवाळीच्या फराळाचे अति प्रमाणात सेवन करणे ही अयोग्यच असते. अशावेळी मन मारून चटकदार फराळाच्या पदार्थांकडे पाठ फिरवत असाल तर थांबा…पोट बिघडण्याची काळजी न करता तुमचे आवडते पदार्थ आता मनसोक्त खा. कारण आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत जे खाऊन तुम्ही तुमच्या शरीराला डिटॉक्स करु शकता.
* लिंबू
लिंबाचे बरेच फायदे आहेत. रात्री, आपण जड अन्न खाल्ले असेल, तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर लिंबाचे काही थेंब पाण्यात मिसळा. लिंबू पाण्यात मिसळल्याने पचन सुधारते. याव्यतिरिक्त, शरीरातील घाण देखील बाहेर येते. जर आपण कोमट पाण्यात लिंबू प्यायले तर ते अधिक फायदेशीर ठरेल.
*ऍपल सायडर व्हिनेगर
ऍपल सायडर व्हिनेगर, ज्याला ऍपल व्हिनेगर देखील म्हणतात. एका ग्लास पाण्यात ऍपल सायरे व्हिनेगरचा एक चमचा मिसळून आपण त्याचे सेवन देखील करू शकता. हे आपल्या शरीरास डिटॉक्स करण्यात खूप फायदेशीर आहे. ऍपल साइडर व्हिनेगर रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते.
*टोमॅटो
टोमॅटो शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते. दिवाळीत भरपूर गोड आणि तळलेले पदार्थ खाल्ल्यावर तुम्ही टोमॅटो खाऊ शकता. यामुळे पचन समस्या उद्भवणार नाहीत. आपण कोशिंबीर किंवा सूप म्हणून टोमॅटो खाऊ शकता.
*कोथिंबीर
कोथिंबीर कोणत्याही अन्नाची चव दुप्पट करते. चटणी बनवून तुम्ही कोथिंबिरीचे सेवन करू शकता. आपल्या आहारात कोथिंबिरीचा समावेश केल्याने शिसे आणि पारा सारख्या धातूचे डिटॉक्स होते.