आपल्या शरीरातील अन्न पचलं नाही तर पचनक्रियेत पोटात विशेष असं ऍसिड स्रवीत होत असतं, हे ऍसिड पचनक्रियेसाठी खूप गरजेचं असतं. अनेक वेळा ऍसिड प्रमाणापेक्षा जास्त वाढतं. त्यामुळं छातीत जळजळ, पोटात आग लागल्यासारखं जाणवतं. अशा परिस्थितीला ऍसिडिटी किंवा ऍसिड पेप्टिक रोग म्हणतात. ( fruits to get rid of acidity )
ऍसिडिटीची कारणं
जेवणात अनियमितता, अन्न योग्य पद्धतीनं न चावणे, पाणी कमी पिणे, मसालेदार आणि जंक फूड खाणे, तणावग्रस्त होत जेवणं, धूम्रपान आणि मद्यपानामुळेही ऍसिडिटी होते. खूप जेवल्यानंतरही ऍसिडिटी होऊ शकते. तसंच सकाळी-सकाळी नाश्ता न करणं आणि खूप काळ उपाशी राहिल्यानंही ऍसिडिटी होते. पोटात जळजळ, छातीत जळजळ, मळमळणे, डिस्पेप्सिया, ढेकर येणं, जेवणाची इच्छा न होणं… जर आपण खालील पाच फळं खाल्ली तर ऍसिडिटीपासून आपली सुटका होईल.
पेरू ( fruits to get rid of acidity )
हंगामी फळ पेरू खाल्ल्यानं बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीमध्ये फायदा होतो. पेरूमध्ये अनेक गुण असतात जे आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. यात व्हिटॅमिन, फायबर आणि मिनरल भरपूर प्रमाणात असतात. फायबर असल्यानं बद्धकोष्ठता दूर ठेवते. पेरूमध्ये “व्हिटॅमिन सी’ खूप प्रमाणात असतं. पेरू नियमितपणे खाल्ल्यानं आपलं सर्दीपासून संरक्षण होतं.
टोमॅटो
शरीरासाठी टोमॅटो खूप फायदेशीर असतात. यातून अनेक रोगांपासून मुक्तता होते. टोमॅटो शरीरातील विशेष करून किडनीमधून रोगांचे जिवाणू काढून टाकतं. यात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन-सी असतं. ऍसिडिटीचा त्रास असेल तर टोमॅटो खाणं सुरू करावं, त्रासापासून मुक्तता मिळते. टोमॅटो चवीला आंबट असतं,
मात्र, ते शरीरातील क्षाराचं प्रमाण वाढवतं म्हणून त्याच्या नियमित सेवनानं ऍसिडिटी होत नाही.
संत्र ( fruits to get rid of acidity )
संत्र्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यात असलेलं फ्रॅक्टोज, डेक्स्ट्रोज, खनिज आणि व्हिटॅमिन शरीरात जाताच ऊर्जा देणं सुरू करतात. संत्र खाणं शरीरासाठी चांगलं असतं, त्यामुळं उत्साह वाढतो. संत्र नियमितपणे खाल्ल्यानं ऍसिडिटीचा त्रास संपतो.
पपई ( fruits to get rid of acidity )
पपई खूप गुणकारी असते आणि सहजपणे मिळणारं हे फळ आहे. यातून निघणारा रस आपल्या वजनापेक्षा 100 पट जास्त प्रोटीन पचवू शकतो. त्यामुळं पोट आणि आतड्यांच्या विकारामध्ये खूप फायदा मिळतो. पपई ऍसिडिटी, खोकला, गॅस, बद्धकोष्ठता सारख्या रोगांमध्ये लाभदायक ठरतं.
जांभूळ ( fruits to get rid of acidity )
मधुमेहाच्या उपचारांमध्ये जांभूळ एक पारंपरिक औषध आहे. जांभूळ मधुमेहाच्या रुग्णांचं फळ असं म्हणूनही ओळखलं जातं. कारण जांभळाचा रस, बी, साल सर्व काही मधुमेहांच्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरतं. सिझननुसार जांभूळ औषधाच्या रूपात खूप खायला हवं. पोटांच्या रुग्णांना त्यामुळं आराम मिळतो. उपाशीपोटी जांभूळ खाल्ल्यानं गॅस आणि ऍसिडिटीची तक्रार दूर होते.