खा. रणजितसिंहांनी केले एस.टी. प्रशासनाचे अभिनंदन

फलटण – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून गाव तेथे एसटी ही संकल्पना राबविताना सर्वसामान्य माणूस, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, शेतकरी यांच्यासाठी वाहतुकीची खात्रीशीर व आपुलकीची सेवा देणारे महामंडळ ही भूमिका गेल्या 71 वर्षात एसटीने यशस्वीरित्या राबविल्याचे प्रतिपादन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) 71 व्या वर्धापन दिनानिमित्त फलटण आगारात आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आगार कार्यालयास भेट देवून शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रभारी आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी त्यांचे स्वागत करुन वर्धापन दिनानिमित्त एसटीने सर्व नवनिर्वाचित खासदारांसाठी खास तयार केलेले स्मृतीचिन्ह प्रदान करुन त्यांचे अभिनंदन केले. नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनीही यावेळी एसटी प्रशासनाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी शरद सोनवणे, प्राचार्य रविंद्र येवले, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शिवलाल गावडे, प्रा. रमेश आढाव, नगरसेविका सौ. वैशाली अहिवळे व सौ. वैशाली चोरमले यांची समयोचित भाषणे झाली. प्रभारी आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. दत्तात्रय महानवर यांनी सूत्रसंचालन आणि श्रीपाल जैन यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.