खा. उदयनराजेंकडून “कास’ची पाहणी 

बिचुकले शेवटी पंतप्रधान आहे

अभिजित बिचुकले यांच्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, त्याचे दिवसातून भरपूर फोन यायचे, त्याला बर वाटावं म्हणून वैतागून मी एकदा म्हणालो, मी त्याला घाबरतो. आतापर्यंत त्याने बऱ्याच लोकांना अडचणीत आणले आणि तिथे (मराठी बिग बॉस) मध्ये तो अडचणीत असेल तर त्याने इथं करतो तशाच केसेस कराव्यात, शेवटी तो पंतप्रधान आहे.

सातारा – सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातारा येथील कास तलावाची पाहणी साताऱ्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी आज केली. कास धरणाची उंची वाढवण्याचे काम सध्या सुरू आहे. उन्हाच्या तडाख्याने या तलावातील पाणी पातळीसुद्धा खाली गेली आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्‍नांवर उत्तर दिली. साताऱ्यात प्रत्येकी तीन वॉर्डाचे नियोजन करून तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेणार असल्याचे स्पष्ट केले.

कास तलावातील पाणी शहराला आणखी पंधरा दिवस पुरेल. मात्र नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन त्यांनी केले. कास धरण उंचीचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. सातारा शहरातील हद्दवाढीबाबत बोलत असताना त्यांनी हद्दवाढ ही अटळ आहे.

त्याला कोणीही विरोध केला तरी हद्दवाढ ही होणार आहे, असे सांगितले. तसेच कास आणि बोंडारवाडीसारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून लोकांना पाणी देण्याचे काम मी करणार आहे. जेणेकरून विरोधकांनी मला पाणी पाजयचा विचार करू नये ही त्यांना विनंती, तसेच लोकांनीसुद्धा पाण्याचा काटकसरीने वापर करावा अन्यथा कारवाई होणार. स्वभाव बदलेला आहे असे विचारले असता उदयनराजे म्हणाले पत्रकारांमुळे मी संयमाने वागतोय आणि परिपक्व सुद्धा झालो आहे. तस काही नाही मी आहे तसाच आहे असे देखील त्यांनी हसून सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.