पिंपरी, दि. 23 – गेट वे पॉलिटिकल स्टॅटेजिक संस्थेमार्फत 17 व्या लोकसभेच्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिल्या सत्रापर्यंतच्या देशातील खासदारांच्या कामगिरीचे विश्लेषण केले आहे. त्यानुसार संसदेतील कामकाजात सक्रिय सहभागी होणाऱ्या मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा पहिल्या दहामध्ये दुसरा क्रमांक लागत आहे. 148 वेळा चर्चेत सहभाग आणि 508 प्रश्न विचारत खासदार बारणे यांनी दुसरा क्रमांक पटकाविला असे विश्लेषण संस्थेने केले असल्याची माहिती खा. बारणे यांनी दिली.
देशाच्या लोकसभेतील खासदारांच्या कामाचे मुल्यांकन केले जाते. त्यानुसार 17 व्या लोकसभेतील खासदारांच्या कामगिरीचे मुल्यांकन केले आहे. त्यातील पहिल्या दहा खासदारांची यादी लोकसभेच्या संकेतस्थळावर अधिकृत प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये मावळचे खासदार श्रीरंग बारणे दुसऱ्या स्थानावर आहेत. खासदार श्रीरंग बारणे यांनी आत्तापर्यंत 17 व्या लोकसभेत 508 प्रश्न विचारले आहेत. 148 वेळा चर्चेत सहभाग घेतला. सभागृहातील उपस्थितीती 94 टक्के असून दहा टक्के खासगी विधेयके मांडली आहेत. मावळातील प्रश्न सातत्याने मांडल्याने खासदार श्रीरंग बारणे यांना सलग सात वेळा संसदरत्न, महासंसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
संसदेतील कामकाजात सक्रियपणे सहभाग घेवून मतदारसंघातील प्रश्नांबाबत सातत्याने आवाज उठवित आहे. प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करत आहे.17 व्या लोकसभेत आत्तापर्यंत 508 प्रश्न विचारले आहेत. 148 वेळा चर्चेत सहभाग घेतला. सभागृहातील उपस्थितीती 94 टक्के असून दहा टक्के खासगी विधेयके मांडली आहेत. यामुळेच हा क्रमांक प्राप्त झाला. आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
– श्रीरंग बारणे, खासदार, मावळ लोकसभा.