अकोले: लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातून सदाशिवराव लोखंडे हे विक्रमी मताधिक्यने विजयी झाले. त्याबद्दल त्यांचा कळस ग्रामस्थांनी सत्कार केला.
खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी शिर्डी मतदारसंघात विक्रम करीत दुसऱ्या वेळी चांगल्या मतांनी विजय मिळवल्याबद्दल कळसच्या ग्रामस्थांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला. खा. लोखंडे यांचा सत्कार भाजपचे सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, शिवसेनेचे अकोले विधानसभा संयोजक रावसाहेब वाकचौरे, माजी सरपंच कारभारी वाकचौरे, कळस शिवसेना प्रमुख विनायक वाकचौरे, कळस खुर्दचे शाखाप्रमुख एकनाथ वाकचौरे, बाजीराव ढगे, युवा सेनेचे विश्वास वाकचौरे, प्रसाद वाकचौरे, महेश वाकचौरे, सागर वाकचौरे, नागेश वाकचौरे, अभिषेक वाकचौरे, संकेत वाकचौरे आदी उपस्थित होते.