महिलांसाठीचे सुलभ शौचालय कुलूपबंद

नगर – केंद्र आणि राज्य शासनाने राबविलेल्या स्वच्छता अभियानाचा शहरात बोजवारा उडाला आहे. शहरात बऱ्याच ठिकाणी मनपा प्रशासनाची स्वतःची स्वछता गृहे आहेत. मात्र बरीच स्वच्छतागृहे कायम अस्वच्छ आहेत. शहरात महिलांसाठी फारच कमी स्वच्छता गृहे आहेत. प्रोफेसर चौकातील महिला शौचालयायला कुलूप ठोकल्यामुळे महिलांची मोठी पंचाईत होते.

साडेतीतील प्रोफेसर कॉलनी चौकात स्वच्छ भारत अभियनांतर्गत स्वच्छता गृह बांधण्यात आले आहे. पण त्या स्वच्छतागृहांची साफ सफाई होत नसल्याने तिथे घाण झालेली आहे. त्यामुळे नागरिक उघड्यावरच मूत्रविसर्जन करतांना दिसतात. येथील महिलांसाठी असलेल्या स्वछता गृहाला मनाला प्रशासनाने चक्क कुलूप ठोकले आहे. शहरात आधीच महिला प्रसाधन गृहे कमी आहेत.

त्यात प्रोफेसर कॉलनीत महिला स्वछता गृह आहे. मात्र, ते कुलूप बंद असल्याने इथे भाजी पाला विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांची मोठी गैरसोय होते. नैसर्गिक विधी करण्यासाठी स्वछता गृह असतात, मात्र स्वछता गृहाला कुलूप ठोकल्याने महिला नैसर्गिक विधीला करत नाहीत. त्यामुळे पोटाच्या व इतर अनेक आजारांना आमंत्रण मिळते.

महिलांसाठी शौचायला सारख्या मूलभूत सोयी शहरात नाहीत. शिवाय नुसती असुर भागणार नाही चालू स्थितीत असावी. महापालिकेचे कर्मचारी स्वछता गृहाच्या स्वच्छतेसाठी येत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे असून भाजीपाला विक्री करणाऱ्या महिला हतबल झाल्या आहेत. महापालिकेने सफाई कर्मचारी पाठवून स्वछता गृहाची स्वच्छता करण्याची गरज आहे. नाहीतर या योजनेचा उपयोग होणार नाही, फक्त खराब स्वच्छता गृहांचे उद्दिष्ट पूर्ण होऊन ते केवळ शोभेची वस्तू बनून राहील.

मनपा प्रशासनाने सार्वजनिक सौचालयच्या मूलभूत समस्येकडे, स्वछतेकडे गंभीरपणे पाहणे आणि स्त्रियांच्या शौचालयाकडे संवेदनशीलतेने बघणे गरजेचे आहे. महापालिकेतील आरोग्य कर्मचाऱ्यांची अनास्था आणि नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे प्रोफेसर कॉलनी चौकातील स्वच्छता गृहाची वाट लागलेली आहे. महापालिकेने स्वच्छता ठेवणे गरजेचे असल्याने महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.