इस्टबोर्न टेनिस स्पर्धेत प्लिस्कोव्हा अंतिम फेरीत

इस्टबोर्न – जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिला इस्टबोर्न खुल्या टेनिस स्पर्धेतील अंतिम फेरीत विम्बल्डन विजेती खेळाडू अँजेलिक कर्बर हिच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. चेक प्रजासत्ताकची खेळाडू प्लिस्कोव्हा हिने किकी बर्टन्स हिचा 6-1, 6-2 असा दणदणीत पराभव केला. तिने 55 मिनिटांत हा सामना जिंकताना पासिंग शॉट्‌सचा बहारदार खेळ केला. त्यामध्ये तिने 21 बिनतोड फटक्‍यांचा उपयोग केला. कर्बर ही उपांत्य फेरीबाबत नशीबवान ठरली. तिची प्रतिस्पर्धी ओन्स जेब्युर हिने दुखापतीमुळे माघार घेतली.

पुरुषांच्या विजेतेपदासाठी टेलर प्रिट्‌झ व सॅम क्‍युएरी या दोन्ही अमेरिकन खेळाडूंमध्ये सामना होणार आहे. टेलर याने तृतीय मानांकित खेळाडू काईल एडमंड याचा 7-6 (10-8), 6-3 असा पराभव केला. क्‍युएरी याने इटलीच्या थॉमस फॅबिआनो याचे आव्हान 6-3, 6-7 (4-7), 6-3 असे संपुष्टात आणले. त्याने पासिंग शॉट्‌सचा बहारदार खेळ केला.

Leave A Reply

Your email address will not be published.