पुणे – जिल्ह्यात करोनाचा कहर सुरूच असून दोन महिन्यांपासून ग्रीन झोनमध्ये असलेले खेड, जुन्नर, भोर तालुक्यांची वाटचाल सध्या करोना हॉटोस्पॉटच्या दिशेने होत आहेत. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 13 रुग्णांची भर पडली आहे.
दिवसेंदिवस ग्रामीण भागात रुग्णांमध्ये वाढ होत असून आतापर्यंत आढळलेले हे रुग्ण मुंबई किंवा पुण्याहून आलेले आहे. त्यामुळे बाहेरगावांहून येणाऱ्यांना येऊ नका रे बाबांनो म्हणण्याची वेळ गावागावांवर आली आहे.
तर बाहेर गावाहून गावी येणाऱ्यांनी लपून छपून न येता नियमानुसार गावी यावे व 14 दिवस क्वारंटाइनचा कार्यकाळ पूर्ण करून निधड्या छातीने गावात वावरावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.