नवी दिल्ली – विक्टर पेरेजने अंतिम क्षणी पेनल्टी कॉर्नरव्दारे केलेल्या गोलच्या बळावर ईस्ट बंगाल संघाने सोमवारी आय लीग फुटबाॅल स्पर्धेतील सामन्यात रियल काश्मीरचा 1-0 असा पराभव करत विजय नोंदविला. या विजयासह ईस्ट बंगाल संघाने आणखी तीन गुण खात्यात जमा केले आहेत.
FULL-TIME ⌛@eastbengalfc nicked the 3⃣ points in the end, thanks to a Victor Perez penalty ?
RKFC 0⃣-1⃣ QEB#RKFCQEB ⚔ #HeroILeague ? #LeagueForAll ? #IndianFootball ⚽ pic.twitter.com/Z4PLoFS8Ye
— Hero I-League (@ILeagueOfficial) March 9, 2020
सामन्या दरम्यान दोन्ही संघाच्या खेळाडूंनी एकमेकांविरूध्द आकम्रक खेळ केला. त्यामुळे रियल काश्मीरच्या दोन आणि ईस्ट बंगालच्या एका खेळाडूला लाल कार्ड मिळाले होते. पेरेजने सामन्याच्या अतिरिक्त वेळेत (90+5) गोल करत संघास विजय मिळवून दिला.
या विजयासह ईस्ट बंगालचे 16 सामन्यात 23 गुण झाले असून गुणतालिकेत ते दुसऱ्या स्थानी पोहचले आहेत. तर, रियल काश्मीर संघाचे 15 सामन्यात 22 गुण झाले असून ते गुणतालिकेत चौथ्या स्थानी कायम आहेत.