#व्हिडीओ: पाकिस्तानमध्ये भूकंप

इस्लामाबाद : इस्लामाबाद, पाकव्याप्त काश्‍मीर, पेशावर, रावळपिंडी आणि लाहोरसह पाकिस्तानच्या उत्तर भागात भूकंपचा जोरदार तडाखा बसला. रिश्‍टर स्केलवर त्याची तिव्रता 5.8 नोंदवण्यात आली. सुमारे 8 ते 10 सेकंद ही भूमी हादरत होती. यात 23 जण मरण पावल्याचे प्राथमिक वृत्त असून 300 जण जखमी झाले आहेत.जखमींपैकी १००जण अत्यवस्थ असल्याचे सांगण्यात येत आहे.

सियालकोट, सरगोंधा, मेनसेहरा, गुजरात, चित्रल, मलकंद, मुल्तान, शांगला,बाजौर सडात, सहीवल,रहीम यार खान आणि मिरपूर या शहरात सर्वाधिक हानी झाली. मिरपूरमधील रस्ते खचून गेले आहेत. यात शेकडो जण जखमी झाले आहेत. अनेक ठिकाणी घरे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, या भूकंपाची तीव्रता श्‍टिर स्केलवर 5.8 नोंदवली गेली. त्याचा केंद्रबिंदू जमीनीखाली 10 किमी होता, असे पाकिस्तानच्या भूगर्भ शास्त्र विभागाचे उपसंचालक नजीब अहमद यांनी सांगितले. भारतीय भूगर्भ खात्याने मात्र या भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्‍टर स्केल असल्याचे सांगितले आहे. भारतात दिल्ली, पंजाब, हरियाना, काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले 

दुपारी चारच्या सुमारास उत्तर झेलमच्या सीमेवर पंजाब आणि पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये भूकंपाचे हे धक्कले बसले. पाकिस्तानातील पंजाब परगणा, खायबर पुख्तून भागातही भुकंपाचे धक्के बसले. मात्र पाकव्याप्त काश्‍मिरमधील मरिपूर येथे सर्वाधिक हानी झाल्याचे वृत्त आहे.
मिरपूरमध्ये इमारत कोसळल्याने 50 जण जखमी झाले. एका रस्ताची तर अक्षरश: चाळण झाली असल्याचे स्थानिक नागरिक सज्जाद जरल आणि काझी ताहीर यांनी सांगितल्याचे वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेने दिले आहे. भुकंप झाल्यानंतर नागरिकांत घबराट पसरली. सर्वांनीच इमारतीतून रस्त्यावर धाव घेतली.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी लष्करातील जवानांनी स्थानिक प्रशासनाला मदत करण्याचे आदेश दिले आहेत. मदत कार्यात सहभागी होण्यास सांगितले आहे, असे ट्विट लष्कराचा जनसंपर्क विभागाने केले आहे.
(लवकरच सविस्तर वृत्त )

Leave A Reply

Your email address will not be published.