डोटी : नेपाळमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. आज पहाटे नेपाळमध्ये भूकंपाचा मोठा धक्का बसला आहे. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, यात ५ जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. ६.३ रिश्टर स्केलच्या या भूकंपाचे हादरे राजधानी दिल्ली परिक्षेत्रातही बसले आहेत.
नेपाळमधील डोटी जिल्ह्यामध्ये पहाटेच भूकंप झाल्याची घटना घडली आहे. या भूकंपात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जण जखमी झाले आहेत. जखमी नागरिकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून नेपाळच्या लष्कराकडून बचावकार्य केले जात आहे. या भूकंपात अनेक घरेदेखील जमीनदोस्त झाली आहेत. या भूकंपाचे धक्के रात्री २ वाजता राजधानी दिल्ली परिक्षेत्रातही जाणवले. येथे रात्री २ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के बसले असल्याची माहिती समोर आली आहे.
Nepal | An earthquake of magnitude 6.3 occurred in Nepal, Manipur at around 1.57 am on Nov 9. The depth of the earthquake was 10 km below the ground: National Center for Seismology
Strong tremors from the earthquake were also felt in Delhi pic.twitter.com/YNMRQiPEud
— ANI (@ANI) November 8, 2022
या भूकंपाची खोली जमिनीपासून १० किमी खाली असल्याची माहीती येथील राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे. या भूकंपामध्ये मृत्यू झालेल्यांची ओखळ अद्याप पटलेली नाही. मात्र मृतांमध्ये एक महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे.
दरम्यान मागील २४ तासांमधील नेपाळमधील हा दुसरा भूकंपाचा धक्का आहे. याआधी मंगळवारी सकाळी ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते.