नवी दिल्ली – राजधानी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसराला आज भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, फरिदाबाद आणि राजधानीच्या अन्य परिसरामध्ये संध्याकाळी 8 वाजण्याच्या सुमारास या भूकंपाचे धक्के जाणवले.
उत्तर प्रदेशच्याही काही भागांमध्ये या भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 5.4 रिश्टर इतकी नोंदवली गेली.
भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये भूगर्भात 10 किलोमीटरवर होता. या भूकंपामुळे जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
दोनच दिवसांपूर्वी नेपाळमध्ये 6.3 क्षमतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाचे धक्के उत्तर प्रदेश, दिल्ली आणि उत्तराखंडच्या काही भागांमध्येही जाणवले होते. यामुळे नेपाळमध्ये 7 जणा ठार झाले होते. मात्र भारतात जीवितहानी झाली नव्हती. त्यानंतर लगेच आज परत भूकंपाचा धक्का जाणवला आहे.