इंस्तबुल – तुर्की आणि ग्रीसमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता इतकी होती की अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. यात आतापर्यत 4 जण ठार झाले असून 120 जणांहून अधि जखमी झाले आहेत.
या भूकंपाती तिव्रता अधिक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
पश्चिम तुर्कीच्या किनाऱ्यावर शुक्रवारी 6.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा मोठा भूकंप झाला. अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षणानुसार तुर्कीत झालेल्या भूकंपात अनेक इमारतींचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
तुर्कीचे गृहमंत्री सुलेमान सोयुलू यांनी ट्वीट केले की, इजमिर भागात आतापर्यंत सहा इमारतींचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, जानेवारीमध्ये तुर्कीच्या सिव्रीस येथे झालेल्या भूकंपात 30 हून अधिक लोक ठार तर 1600 हून अधिक लोक जखमी झाले होते.