गुजरातमधील राजकोटजवळील गोंडल येथे बुधवारी (8 डिसेंबर) सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता मोजली असता 3.8 मैग्निट्यूड बघावयास मिळाली आहे. भूकंपाची माहिती मिळताच नागरिकांमध्ये घबराट पसरली. लोक आपापल्या घरातून बाहेर पडले. या भूकंपामुळे आतापर्यंत कोणतीही जीविहतहानी झाल्याचे वृत्त नाही. यापूर्वी 30 नोव्हेंबर रोजी लडाखमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुधवारी सकाळी गुजरातमधील गोंडल, राजकोटमध्ये भूकंपाचे अनेक धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.8 इतकी मोजली गेली. भूकंपाच्या सततच्या धक्क्यांमुळे लोक घराबाहेर पळू लागले. मात्र, यामध्ये कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही.
अनेक भूकंप संवेदनशील श्रेणीपैकी सर्वात धोकादायक सिस्मिक झोन 5 आहे. जिथे आठ ते नऊ रिश्टर स्केल तीव्रतेने भूकंप येण्याची शक्यता आहे. गुजरात भूकंपाच्या झोन 3 मध्ये येतो. जो मध्यम धोकादायक श्रेणीचा आहे.
गुजरात व्यतिरिक्त, या श्रेणीमध्ये केरळ, गोवा, लक्षद्वीप, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालचा उर्वरित भाग, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओरिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकचा समावेश आहे.