न्यूयॉर्क: अर्जेटिना आणि चिलीमध्ये भूकंपाचे मोठे धक्के बसल्याची माहिती पुढे आली आहे. अमेरिकेच्या जिऑलॉजिकल सर्वे या संस्थेने याची पुष्टी केली आहे. अर्जेंटिनाच्या सॅन अँटिनियो डी लॉस कॅब्रेसच्या उत्तर-पश्चिम भागात या भूकंपाचे केंद्र असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आतापर्यंत या भूंकपामुळे कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही.
अमेरिकेच्या जिऑलॉजिकल सर्वे च्या सूचनेनुसार, भूकंप साधारण बुधवारी रात्र झाला आहे. पृथ्वीच्या अंतरंगात जवळपास २१० किमी खोल या भूकंपाचे केंद्र आहे.
तर दुसरीकडे चिलीच्या इक्विकमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.या भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर स्केलच्या एवढी असल्याचे सांगण्यात येत आहे.
या भूकंपाचे केंद्र इक्विकपासून ५१९ किमी दक्षिण-पूर्व भागात असल्याचे सांगण्यात येत आहे.इक्विक हे उत्तर चिलीमधील अटाकामा वाळवंटाच्या पश्चिम भागातील एक तटीय शहर आहे. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्त हानी झाल्याची माहिती नाही,
दरम्यान, अर्जेंटिना आणि चिलीमधील भूकंपाच्या अगोदर पाकिस्तानसह अफगाणिस्तानचा काही भाग भूकंपाने हादरला होता. दोन्ही देशांतील सुमारे १२ जण ठार, तर २५० जण मृत्युमुखी पडल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती.