कोयना परिसरात रविवारी रात्री भूंकपाचा सौम्य धक्का

सातारा – कोयना परिसराला रविवारी रात्री 3.5 रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 16 किमी अंतरावर गोषटवाडी गावच्या नैऋृत्येला 9 किमी अंतरावर होता.

भूकंपाची खोली 11 किमी इतकी होती. या भूकंपाचा धक्का कोयना, पोफळीसह पाटण, कराड तालुक्याला धक्का जाणवला. भूकंपाने कोठेही हानी झाली नसल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.