वृत्तसंस्था – हैती देशात शक्तीशाली भूकंप झाला असून या भूकंपात 1 हजार 297 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 हजार 800 पेक्षा नागरिक जखमी झाले आहेत. 7.2 रिश्टर स्केल ऐवढा शक्तीशाली हा भूकंप होता. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचावकार्य वेगाने चालू करण्यात आले आहे.
Toll from earthquake in Haiti rises to 1,297
Read @ANI Story | https://t.co/aIolRDZCJg#haitiearthquake pic.twitter.com/6i7KYSsjVH
— ANI Digital (@ani_digital) August 15, 2021
अमेरिकेजवळील अटलांटिक महासागरातील हैती या देशात भूकंप झाला असून अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेने तात्काळ मदत पोहचली आहे.या भूकंपाच्या धक्क्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित तसेच वित्तहानी झाली आहे.
शनिवारी पहाटे ५.२७ वाजता अमेरिकेच्या आलास्कामध्येही भूकंपाचे झटके बसले होते. त्याची तीव्रता ६.९ रिश्टर स्केल होती. या भूकंपामुळे 800 पेक्षा जास्त घरं जमिनदोस्त झाली आहेत. तर शेकडो घरांना तडे गेले आहेत. पंतप्रधान एरियल हेनरी यांनी नागरिकांना तात्काळ मदत करण्याचे आदेश दिले आहेत.