लडाखला भूकंपाचा धक्का

लडाख, – लडाखचा परिसर शनिवारी पहाटे भूकंपाने हादरला. या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पहाटे लोक झोपेत असताना भूकंपाने जागे झाले. दरम्यान, या भूकंपाचे केंद्रबिंदू समजू शकलेले नाही. राष्ट्रीय भूगर्भशास्त्र केंद्राकडून याबाबत माहिती घेण्याचे काम सुरु आहे. भूकंप केंद्र कुठे आहे याचा शोध घेत आहे. मात्र, भूकंपामुळे लडाखमध्ये आतापर्यंत मोठे नुकसान तसेच जीवित हानी झालेली नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज पहाटे 5:11 वाजता भूकंपाचा झटका बसला. रिश्‍टर स्केलवर 6.6 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली आहे. येथील नागरिक या घटनेमुळे अजुनही भीतीच्या छायेखाली आहेत. भूकंप झाल्याचे समजताच लोकांनी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी गोंधळाचे वातावरण दिसून आले. .

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.