इंडोनेशियाला भुकंपाचा धक्‍का; 20 जण ठार

अंबोन सिटी (इंडोनेशिया) – येथील मुलुकू आयलंड्‌स येथे गुरूवारी 6.5 मॅग्निट्यूडचा भुकंपाचा धक्‍का बसला असून भुकंपामुळे किमान 20 जणांचा मृत्यू झाला असून किमान 100 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका नवजात बाळाचा समावेश असल्याचे सांगितले. तर, मुलुकू आयलंड्‌स येथे कोसळलेल्या दरडीखाली एक जण अडकल्याचे सांगितले जात आहे.

गुरूवारी सकाळी अंबोन सिटी येथे झालेल्या भुकंपामुळे अनेक घरांना तडे गेले. तर, काही इमारती कोसळल्याने नागरिकांनी रस्त्यांवर धाव घेतली. यावेळी खबरदारीचा उपाय म्हणुन जवळपास 2 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यत आल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थेचे प्रवक्ता ऍग्युस विबिओयांनी दिली आहे. सकाळच्या वेळी या भागात जवळपास 24 वेळा भुकंपाचे धक्‍के जानवले ज्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता.

यावेळी या धक्‍क्‍यांमध्ये सर्वात मोठा धक्‍का हा 6.5 मॅग्निट्युडचा होता. तर, सर्वात कमी 5.6 मॅग्निट्युडचा होता. यावेळी भुगर्भिय सर्वेक्षणसंस्थेने भुकंपाचा केंद्रबिंदूहा अंबोन सीटीच्या 37 किलोमिटर उत्तरेला जमीनीच्या 29 किमी खोल होता असे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.