गुवाहाटी : आसामच्या काही भागांना रविवारी सकाळी भूकंपाचा धक्का बसला. सुदैवाने, त्यात कुठलीही जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचे समजते. प्रामुख्याने आसामच्या उत्तर-मध्य भागांत भूकंपाचा धक्का जाणवला.
रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ४.२ इतकी नोंदली गेली. सकाळी ७.४७ वाजता झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू गुवाहाटीपासून उत्तरेकडे १०५ किलोमीटर अंतरावर जमिनीपासून १५ किलोमीटर खोलीवर होता. संबंधित ठिकाण आसाम-अरूणाचल प्रदेश सीमेपासून जवळ आहे.
भूकंपाचा धक्का जाणवलेल्या नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली. अनेकांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून घरांमधून बाहेर पडून मोकळ्या जागी धाव घेतली. अरूणाचल आणि भूतानमधील काही भागांतही भूकंप जाणवला. मात्र, कुठली हानी न झाल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.