नवी दिल्ली – जम्मू-काश्मीर आणि पश्चिम बंगालला रविवारी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरला रविवारी रात्री 12.54 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही.
जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.2 सांगण्यात आली. त्यानंतर काही वेळातच पश्चिम बंगालमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. पश्चिम बंगालला 4.0 तीव्रतेचा धक्का रात्री 2.55 वाजता जाणवला. याचा केंद्रबिंदू पुरुलिया येथे असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी बुधवारी हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्याला भूकंपाचे धक्के जाणवले होते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चंबा जिल्ह्याला रात्री 12 वाजून 47 मिनिटांनी मध्य तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला होता.