2021 Best Business – बोन्साई प्लांट (Bonsai Plant) एक असे रोप आहे ज्याला आजकाल लोकांचं गुडलक मानलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही या रोपापासून चांगली कमाई करू शकता. आज आम्ही तुम्हाला सांगू की तुम्ही कशा पद्धतीने या रोपांची शेती करू शकता आणि यासाठी तुम्हाला किती रूपये खर्च करावे लागणार आहेत.
आजकाल सजावट आणि गुडलक व्यतिरिक्त ज्योतिष शास्त्र, वास्तुशास्त्रासाठी देखील या रोपाचा वापर केला जाऊ शकतो. केंद्र सरकारदेखील या शेतीसाठी आर्थिक सहाय्य करते.
तुम्ही केवळ 20 हजार रूपयांत हा बिजनेस सुरू करू शकता. सुरूवतीला तुमच्या आवश्यकतेनुसार, छोट्या किंवा मोठ्या स्वरूपात हा बिजनेस सुरू करा. नंतर नफा आणि विक्री वाढल्यावर बिजनेस वाढवू शकता.
किती असते या प्लांट ची किंमत –
आजकाल लकी प्लांटच्या रूपात याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. याचा वापर घर आणि ऑफिसमध्ये सजावटीसाठीही केला जातो. यामुळे सध्या याला खूप जास्त मागणी आहे. बाजारात सध्या या रोपाची किंमत 200 रूपये ते 2500 रूपयांपर्यंत आहे. याव्यतिरिक्त बोनसाई प्लांट चे चाहते याची मागेल तेवढी किंमत देण्यासाठीही तयार असतात.
दोन पद्धतीने करू शकता बिजनेस –
पहिल्या पद्धतीनुसार खुप कमी गुंतवणूकीत हा बिजनेस सुरू करू शकता. मात्र, तुम्हाला थोडा वेळ लागले. कारण की बोनसाई प्लांटला तयार होण्यासाठी कमीत कमी दोन ते पाच वर्षांचा कालावधी जातो. याशिवाय नर्सरीतून तयार प्लांट आणून 30 ते 50 टक्के अधिक किंमतीने विकू शकता.
कोणत्या साहित्याची आहे आवश्यका –
हा बिजनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला स्वच्छ पाणी, वाळू, कुंडी आणि काचेचे पाॅट, जमीन किंवा छत, काचेच्या गोळ्या, पातळ तार, रोपांवर पाणी शिंपडण्यासाठी स्र्पे बाॅटल, शेड बनवण्यासाठी जाळी या साहित्यांची आवश्यकता आहे. जर तुम्ही छोट्या स्वरूपात गुंतवणूक करणार असाल तर 5 हजार रूपये आणि मोठ्या प्रमाणात करत असाल तर 20 हजार रूपयांपर्यंत खर्च येतो.
एवढी मदत करेल सरकार –
तीन वर्षात 240 रूपये प्रति प्लांट खर्च येईल, त्यापैकी प्रति रोप 120 रूपये सरकारी मदत मिळेल. ईशान्य वगळता अन्य भागात या शेतीसाठी 50 टक्के सरकार आणि 50 टक्के शेतकऱ्यांना खर्च करावा लागतो. 50 टक्के सरकारी वाट्यात 60 टक्के केंद्र सरकार आणि 40 टक्के राज्य सरकारचा वाटा असेल. जिल्यातील नोडल अधिकारी तुम्हाला याबाबत पूर्ण माहिती देतील.
3.5 लाखाची होईल कमाई –
गरज आणि प्रजातीनुसार एक हेक्टरमध्ये 1500 ते 2500 रोपं लावू शकता. जर तुम्ही 3*2.5 मीटरवर रोपं लावली तर एक हेक्टरमध्ये 1500 रोपं लागतील. सोबत दोन रोपांच्या मध्ये उरलेल्या जागेत तुम्ही इतर पिकही घेऊ शकता. चार वर्षानंतर 3 ते 3.5 लाख रूपयांचे उत्पन्न मिळवू शकाल.