पिंपरी – तनपुरे फाउंडेशन आणि पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम यांच्या वतीने येत्या रविवारी (दि. 19) निगडी-भेळ चौक येथील “अ’ प्रभाग कार्यालयासमोर सकाळी 9:30 ते दुपारी 1 या वेळेत इलेक्ट्रॉनिक कचरा (ई-कचरा) संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती अनिल पालेकर यांनी दिली.
खराब इलेक्ट्रॉनिक व इलक्ट्रिकल वस्तू या मोहिमेत नागरिकांकडून स्विकारण्यात येणार आहेत. संबंधित वस्तू महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मान्यताप्राप्त संस्थेला देण्यात येणार आहेत. संबंधित संस्था शास्त्रीय पद्धतीने या वस्तूंची
विल्हेवाट लावते.