पालिका अधिकाऱ्यांच्या सेवेत येणार ई-कार

पुणे – अधिकारी, पदाधिकाऱ्यांसाठी पालिका प्रशासनाकडून इलेक्‍ट्रीक कार खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी कार तयार करणाऱ्या प्रमुख कंपन्यांकडून प्रस्तावही मागविले आहेत.

महापालिकेच्या ताफ्यात सध्या 34 ऍम्बेसिडर कार आहेत. काही पदाधिकारी तसेच प्रमुख अधिकाऱ्यांना या कार देण्यात आली आहे. मात्र, त्याचा पेट्रोल तसेच देखभाल खर्च अवाक्‍या बाहेर गेल्याने हा निर्णय घेण्यात आला. त्याचवेळी पालिकेने शासनाच्या निकषानुसार, नव्याने खरेदी केलेल्या भारत 6 या निकषाच्या गाड्यांना महिन्याला अवघे 60 ते 65 लीटर पेट्रोल लागत असून त्याचा देखभालीचा खर्चही कमी आहे. त्यामुळे या गाड्यांना खरेदीसाठी प्राधान्य देण्यात येत असले तरी, केंद्राकडून आता इलेक्‍ट्रीक कार घेण्यासही प्राधान्य दिले जात आहे. तसेच शासकीय विभागांकडून या गाड्या खरेदी केल्यास त्यावर सवलतही आहे. पालिकेच्या 2019-20 या आर्थिक वर्षासाठी या कार खरेदीला 1 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.