ज्ञानदीप लावू जगी : व्रत करा एकादशी सोमवार ।

सप्त शतकोत्तर रौप्यमहोत्सवी समाधी वर्ष (इ.स. 1296-2021)

-ह.भ.प. संतोष म. शास्त्री

तीर्थ व्रतनेम भावेवीण सिद्धी । 

वायांची उपीधि करिसी जना ।। 

संत ज्ञानेश्‍वर महाराज ( Sant Dnyaneshwar Maharaj ) हरिपाठातील बाराव्या अभंगात म्हणतात, तीर्थव्रत व नेम यांची पूर्णतः तेव्हाच होऊ शकते जेव्हा ती साधने करीत असता हरिविषयी पूर्णभाव असेल, तरच या साधनांच्या आचरणाने सिद्धी प्राप्त होईल.

व्रत कोणते करावे यासंदर्भात संत तुकाराम महाराज ( Sant Tukaram Maharaj ) म्हणतात,

व्रत करा एकादशी सोमवार । कथा पूजन हरिजागर । पुण्य ते असे गातां नाचतां फार । पुन्हा बोलिला संसार नाही नाही सत्वते ।।

म्हणजेच, एकादशी व सोमवार ही व्रते करा. त्या दिवशी सकाळी देवाचे पूजन व रात्री हरिकथा करून जागर करावा. नाम गाऊन आनंदाने नाचले असता फार पुण्य आहे. त्याला खरोखर पुन्हा जन्ममृत्युरूपी संसारात येणे नाही.

तुकोबाराय म्हणतात, एकादशी व्रत सोमवार न करिती । कोण त्यांची गति होईल नेणों ।। दर पंधरा दिवसांनी येणारी एकादशी व आठवड्यातून येणारा सोमवार ही व्रते जे करीत नाहीत ते कोणत्या गतीला जातील हे मला कळत नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.