ज्ञानदीप लावू जगी : जैसा भ्रमर भेदी कोडें

सप्त शतकोत्तर रौप्यमहोत्सवी समाधी वर्ष (इ.स. 1296-2021)

-ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे देहुकर

जैसा भ्रमर भेदी कोडें। भलतैसें काष्ठ कोरडें। परि कळिकेमाजी सांपडे। कोंवळिये।। तेथ उत्तीर्ण होईल प्राणें। परि तें कमळदळ चिरूं नेणें। तैसें कठिण कोवळेपणें। स्नेह देखा।। 

माऊली म्हणतात, जसे भुंगा कठीणातले कठीण कोणतेही लाकूड सहज लिलया कोरतो; परंतु तोच कमळाचा स्वाद घेताना कोवळ्या कळीत अडकून पडतो. तो कळीच्या प्रेमामुळे प्राणास मुकतो; पण कळी चिरून बाहेर पडत नाही.

असेच आपणाला दुखावणाऱ्या जवळच्यांना आपण दुखवू शकत नाही. तसे हे प्रेम नाजूक, कोवळे पण कठीण आहे. हे फक्‍त भ्रमराच्या, सामान्य व्यक्‍तीच्या बाबतीत नाही तर बुद्धीमान, ज्ञानी, ऋषीमुनीं, ब्रह्मादीकांच्या बाबतीतही घडते. क्षणिक सुखासाठी किंवा मोहात अडकल्यामुळे, त्यांची सद्‌सद्विवेकबुद्धी नष्ट पावते. फलस्वरूप ते स्वतःच्या नाशाला स्वतःच कारणीभूत होतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.