यंदा कर्तव्य आहे ! अभिनेता वरुन धवन अडकणार लग्नबेडीत

बॉलिवूड अभिनेता वरूण धवन सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षा खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. वरूण आणि त्याची गर्लफ्रेन्ड नताशा दलाल यांचे रोमॅन्टिक नाते कुणापासूनही लपलेले नाहीत.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

नुकत्याच कळालेल्या एका बातमी नुसार वरूण व नताशा हे कपल येत्या या  महिन्यात लग्न करणार असल्याची बातमी आहे.  या डेस्टिनेशन वेडिंगची तयारी सुरु झाल्याचेही या बातमीत म्हटले गेले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

वरूण आणि नताशा अलिबागमध्ये लग्न करणार असल्याचं कळतंय. ते नुकताच पंचतारांकित हॉटेल बुक करण्यासाठी अलिबागला गेला होता. हे एक ग्रँड पंजाबी लग्न असेल. परंतु करोना व्हायरसमुळे या लग्नात फक्त जवळचे लोक उपस्थित असणार आहे. लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी २०० लोकांची यादी तयार केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

दरम्यान, एका एंटरटेनमेंट वेबसाईटने दिलेल्या माहिती नुसार, वरूण व नताशा यांनी गतवर्षीच म्हणजे 2018 मध्ये गुपचूप साखरपुडा केला आहे. दोघांनी कुटुंबीय आणि मोजक्‍या मित्रांच्या उपस्थितीत हा साखरपुडा केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

हा सोहळा अतिशय खासगी ठेवण्यात आल्याने केवळ वरूण व नताशाचे कुटुंब आणि 1-2 अतिशय जवळचे मित्र एवढेच लोक या सोहळ्याला उपस्थित होते. मात्र, या बातमीवर वरूण वा त्याच्या कुटुंबाकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.