खडकवासला – खडकवासला गावातील यशवंत विद्यालय येथे शाळेतील अंतर्गत रस्त्यासाठी दत्तात्रय महादेव कोल्हे यांच्या वतीने दोन गाडी सिमेंट काँक्रिट देण्यात आले आहे. विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून कोल्हे यांनी समस्या जाणून घेतल्या होत्या. अंतर्गत रस्त्याच्या विषयावर लगेच काँक्रिट टाकण्यात आल्याने विद्यार्थ्यां व शिक्षकांकडून कोल्हे यांचे आभार मानण्यात आले.
तसेच नवभारताच्या निर्मितीसाठी नविन मतदार नाव नोंदणी अभियान कोल्हेवाडी येथे जनसंपर्क कार्यालय, कोल्हेवाडी ,किरकटवाडी ,खडकवासला ,नांदेड गाव येथे २६ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२२ पर्यत हे अभियान चालू राहणार असल्याने वय वर्ष अठरा वर्ष पुर्ण आसणा-यांनी नाव नोंदवून घेण्याचे अवाहन दत्ता कोल्हे यांनी केले . कोल्हेवाडीतील स्वप्नगंध सोसायटीमध्ये जेष्ठ नागरिक व महिलांसाठी बसण्यासाठी बेंच लोकार्पणचा कार्यक्रम ही घेण्यात आला.
यावेळी किरण हगवणे , अनिल मते , अशोक मते, अजय मते हे पदाधिकारी उपस्थिती होते . सामाजिक बांधिलकीतून करत असलेल्या कामाबद्दल आमदार भिमराव तापकीर यांनी दत्ता कोल्हे यांचे कौतुक केले.