कर्तव्यदक्ष अन्‌ कुटुंबवत्सलही !

संकलन : लेखिका माधुरी विधाटे

आजचा रंग लाल : तृतीय रूप  चंद्रघंटा

ही दशभुजा देवी आहे. तिने दहा हातात गदा, तलवार, त्रिशूळ, धनुष्यबाण आदी अस्त्रे-शस्त्रे धारण केली आहेत. ही चंद्राप्रमाणे सुंदर देवी सिंहारुढ आहे. या तेजस्वी देवीच्या हातात घंटा आहे. देव आणि दानवांच्या संग्रामात देवेंद्राने देवीला घंटा दिली होती. या घंटेवर चंद्र आहे.

देवी चंद्राप्रमाणे निर्मळ आहे. तसेच घंटेच्या मंजुळ नादाने सकलांना आनंद देते. त्यामुळे तिला चंद्रघंटा असे संबोधतात. तिच्या हातातील घंटानादामुळे दुर्गुणांचे प्राबल्य कमी होते. साधकाच्या मनात सकारात्मकता वाढते. प्रत्येक कष्टाचे निवारण करत समृद्ध जीवनाचे वरदान देणारी चंद्रघंटा देवी विंध्य पर्वतावर निवास करते. त्यामुळे तिला विंध्यवासिनीही म्हणतात. रूद्रावतार धारण केल्यास तिला अंबिका म्हणतात. मातेच्या मंत्रपठणाने भयाचा नाश होतो. साहसप्राप्ती होते.

Leave A Reply

Your email address will not be published.